आपण समाज सेवा करत राहायचं; विधानसभेवर बोलणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही…

आपण समाज सेवा करत राहायचं; विधानसभेवर बोलणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही…

*कोंकण Express*

*आपण समाज सेवा करत राहायचं; विधानसभेवर बोलणं एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही…*

*विशाल परबः मतदार संघात तरुणांचा असलेला बेरोजगारीचा प्रश्न येणाऱ्या काळात मी सोडवणार..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आपण समाजसेवा करत राहायचं जे काय ठरवायचा आहे ते वरिष्ठ ठरवतील मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, विधानसभेवर बोलणे एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही, अशी प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. दरम्यान या मतदारसंघात बेरोजगारीचा प्रश्न हा मोठा आहे. त्यामुळे निश्चितच पुढील येणाऱ्या काळात आपण तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असा त्यांनी विश्वास यावेळी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

श्री परब पुढे म्हणाले सावंतवाडीत एका कंपनीकडून काही तरुणांना नोकरीवरून अचानक काढले. तसेच त्यांचा पगार

देखील वंचित आहे. त्यामुळे निश्चितच त्यांनी मला संपर्क केल्यास आपण तो पालकमंत्री यांच्या कानावर घालून तो

देखील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असेही श्री परब यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!