प्रांताधिकारी कातकर यांचा कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार

प्रांताधिकारी कातकर यांचा कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार

*कोंकण Express*

*प्रांताधिकारी कातकर यांचा कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या हस्ते मानाचा फेटा प्रांताधिकारी कातकर यांना बांधून आणि शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.यावेळी निवृत्त एलआयसी अधिकारी हरी चव्हाण, इलेक्ट्रिक अभियंता सुभाष भंडारे, मंगेश साळसकर आदी उपस्थित होते. जगदीश कातकर यांच्या लोकाभिमुख सेवेची दखल घेऊन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते त्यांना 78 व्या स्वातंत्र्यदिनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.कातकर यांनी नेहमीच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना कणकवली देवगड वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील जनतेच्या कामांना नेहमीच न्याय दिला. महसूल विभागाकडील आवश्यक दाखले अथवा अन्य महसुली कामे करताना कधीच अडवणूक केली नाही. उलट वेळेचे बंधन न पाळता आपण लोकसेवक आहोत ही भावना जपून त्यांनी महसूल विभागाचा कारभार अधिक गतिमान केला. प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या याच कार्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.श्री. कातकर यांनी अधिकारी पदावरून समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा चर्मकार समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!