फोंडाघाट महाविद्यालयात अँटी रॅगिंग विषयी कार्यशा

फोंडाघाट महाविद्यालयात अँटी रॅगिंग विषयी कार्यशा

*कोंकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात अँटी रॅगिंग विषयी कार्यशाळा*

फोंडाघाट मधील कला व वाणिज्य महाविद्यालयात अँटी रॅगिंग कक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांत जनजागृती करण्यासाठी अँटी रॅगिंग कार्यशाळा घेण्यात आली.

सुरुवातीला एफवायबीए मधील विद्यार्थिनी नीता धुरी हिने रॅगिंग म्हणजे काय ते सांगून रॅगिंग चे दुष्परिणाम विद्यार्थ्यांसमोर मांडले. आता रॅगिंग रोखण्यासाठी विद्यार्थ्यांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे तिने आवाहन केले.

त्यानंतर विभाग प्रमुख प्रा विनोदसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युजीसी ने सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयात अँटी रॅगिंग कक्षाची स्थापना करणे बंधनकारक केल्याचे सांगितले. तसेच देशातील सर्व महाविद्यालये, विद्यापीठे व वस्तीगृहे परिसरामध्ये रॅगिंग ची घटना घडू नये यासाठी सरकारने हे धोरण स्वीकारल्याचे सांगितले. रॅगिंगमुळे विद्यार्थ्याचे पूर्ण भविष्य उद्ध्वस्त होते, त्याची नोकरी धंद्याची शक्यता संपुष्टात येते. रॅगिंग मुळे संबंधित विद्यार्थ्याला शारीरिक, मानसिक धक्का बसतो व तो नैराश्यात ढकलला जाऊ शकतो. म्हणूनच रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यास फौजदारी गुन्ह्याखाली अटक होऊ शकते व त्याला दीर्घ शिक्षा होऊ शकते. त्यामुळे रॅगिंगचा बळी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्वरित अँटी रॅगिंग कक्षाशी संपर्क साधावा. अशा विद्यार्थ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, अशी ग्वाही कक्षाच्या वतीने देण्यात आली. विद्यार्थ्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे अँटी रॅगिंग संबंधी विविध पोस्टर्स व व्हिडिओ दाखवण्यात आले…

अध्यक्ष भाषणात महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ संतोष रायबोले यांनी विविध व्यावसायिक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये आणि विशेषता वस्तीगृहामध्ये रॅगिंग कशा पद्धतीने होते याची माहिती दिली. अशा रॅगिंग मुळे विद्यार्थ्यांचा हकनाक बळी जातो याची जाणीव करून दिली.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा विनोदसिंह पाटील यांनी केले तर आभार प्रा संतोष आखाडे यांनी मानले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या कार्यशाळेत उपस्थित होते…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!