Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार

Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार

*कोकण Express*

 *Aadhaar card मध्ये बदल करण्यासाठी कुणी अतिरिक्त पैशांची मागणी केल्यास इथं करा तक्रार*

◾ अनेकदा आधार कार्ड काढताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आदी माहिती नागरिकांना आधार केंद्रावर जावे लागते मात्र संबंधित व्यक्ती माहिती दुरुस्तीसाठी अनेकदा ज्यादा रकमेची मागणी करते.

◾ मात्र याविरोधात तक्रार दाखल करता येते , तशी याविषयीची माहिती आपण या आधी सुद्धा घेतली आहे , दरम्यान माहिती महत्वाची असल्याने आपण परत समजून घेत आहोत

◾ *ज्यादा फी शुल्क आकारल्यास येथे करा तक्रार* – UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार जर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ज्यादा फी संबंधित व्यक्तीने मागितल्यास 194 7 या टोल फ्री क्रमांकावर तसंच help@uidai@gov. in या मेल आयडीवर देखील तक्रार नोंदवता येते.

◾ *आधार अपडेट किती चार्ज असतात*

● आधार अपडेटसाठी नेमके किती चार्ज लागतात याची सविस्तर माहिती आपण याआधी २८ऑगस्ट ला घेतलेली होती , त्यावेळी UIDAI कडून हे दर जारी झाले होते

● दरम्यान UIDAI कडून जारी झालेल्या दरानुसार आधार कार्ड मधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये , तर डेमोग्राफिक तपशीला मध्ये बदलण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतात ,

● तसेच यूआयडीएआयच्या नियमांनुसार 5 ते 15 वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट निशु:ल्क केलं जातं , तर आधार केंद्रावर आधार कार्डाच्या कलर प्रिंट साठी वेगळे चार्ज आकारले जातात

● *दरम्यान आधार कार्डकडून असलेले हे अपडेट* – नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!