*कोंकण Express*
*ग्रामस्थांनी श्रमदानातुन कोनाळकट्टा घोटगेवाडी रस्ता वाहतुकीसाठी केला खुला*
*दौडामार्ग ः प्रतिनिधी*
घोटगेवाडी ग्रामस्थांनी श्रमदानातुन कोनाळकट्टा घोटगेवाडी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला, वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली मोठी झाडे श्री. राजु देसाई, आबा राऊळ, उमेश माळवे,सर्वेश सातार्डेकर, श्री.प्रेमनाथ कदम, काशिनाथ सुतार यांनी कटरच्या सहाय्याने कापली नंतर जेसीबीच्या सहाय्याने ती बाजुला करण्यात आली, तसेच दोन्ही ब्रीजच्या पाईपमधील अडकलेली झाडे आणि गाळ काढून टाकण्यात आला त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आणि ब्रीज वाहतुकीसाठी खुला झाला. पाण्याच्या प्रवाहाने ब्रीजच्या सुरवातीला पडलेले खड्डे माती दगड टाकून बुजविण्यात आले यावेळी सरपंच श्रीनिवास शेटकर, उपसरपंच सागर कर्पे, माजी सरपंच प्रेमनाथ कदम, मोर्ले माजी सरपंच गोपाळ गवस, परेश पांगम, नारायण भणगे, गंगाराम पांगम, पांडुरंग नाईक,सुप्रेश पांगम, पांडुरंग दळवी, परेश धुरी, बाबली दळवी, निलेश कर्पे, अनिकेत कुडतरकर आणि घोटगेवाडी ग्रामस्थ उपस्थित होते,घोटगेवाडी ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आणि पाटबंधारे विभागाच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांचे सहकार्य व श्रमदानातुन रस्ता दोन महिन्यांनी वाहतुकीसाठी खुला झाला याबद्दल ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होत आहे.

