*कोंकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*ओरोस : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांनी खूप चांगले काम केले आहे. जिल्ह्यातील महिलांचा विचार करताना त्यांनी खऱ्या अर्थाने विकास घरोघर पोहोचविला आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखणारा जिल्हा बँकेचे हे अध्यक्ष आहेत, असे गौरवोद्गार आमदार निरंजन डावखरे यांनी काढले. जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मनीष दळवी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आम. निरंजन डावखरे, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संचालक ऍड. प्रकाश बोडस, समीर सावंत, सौ प्रज्ञा ढवण, रवींद्र मडगावकर, विद्याप्रसाद बांदेकर, मेघनाथ धुरी, विद्याधर परब, नीता राणे, प्रकाश मोयें, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.

