*कोंकण Express*
*भजन महोत्सव /स्पर्धा* *2024*
*शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून विठ्ठल मंदिर येथे सावंतवाडी विधानसभा निहाय भजन स्पर्धा*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
महाराष्ट्र राज्याचे लाडके शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री माननीय नामदार दीपक भाई केसरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे दिनांक 26 जुलै ते 28 जुलै या कालावधीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ निहाय भव्य भजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत यानिमित्ताने सुश्राव्य संगीत भजनांची मेजवानीच भजन रसिकांना मिळणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन माननीय दीपक भाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य आणि सौ.पल्लवीताई केसरकर यांच्या हस्ते दिनांक 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 4.00 वाजता होणार आहे. तरी सर्व मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,विभागप्रमुख, ( पुरुष / महिला ) तसेच शहरप्रमुख,उपशहरप्रमुख, ( पुरुष / महिला ) कार्यकर्ते ,शिवसैनिक तसेच दिपकभाई केसरकर मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमास अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन मां.ना. दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
धन्यवाद 🙏🙏
*विनीत – दिपकभाई केसरकर* *मित्रमंडळ.सावंतवाडी*
.