त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे शिक्षण सप्ताहास उत्साहात सुरुवात

त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे शिक्षण सप्ताहास उत्साहात सुरुवात

*कोंकण Express*

*त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे येथे शिक्षण सप्ताहास उत्साहात सुरुवात*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकार शिक्षण व साक्षरता विभागाच्या सुचनेनुसार संपूर्ण भारतभर शिक्षण सप्ताह उपक्रम साजरा होत आहे.त्या निमित्ताने त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेत या उपक्रमाची सुरुवात उत्साहात करण्यात आली.पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक साहित्य तयार केले.यात पहिल्या दिवशी कोडी तयार करून सोडविणे, आव्हानात्मक कार्ड तयार करणे, विविध खेळ,कागद आणि बांबूच्या कांड्या पासून खेळणी व इतर साहित्य तयार करणे,कापड व टाकावू साहित्य यापासून बाहुल्या तयार करणे, खेळ कार्ड बनवणे, विविध तक्ते बनवणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.तसेच वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचन क्लब तयार करण्यात आला.दुसऱ्या दिवशी
मुलभूत संख्याज्ञान आणि साक्षरता उपक्रम राबविण्यात आला.यात सामुहिक निपून प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच गणितीय खेळ, कथा वाचन, गणित तज्ञांच्या गोष्टी, अंकांच्या गोष्टी, ग्रंथालय पुस्तकांचे वाटप, अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले.या सर्व उपक्रमांमध्ये विद्यार्थी उत्साहात सहभागी झाले.या उपकमात प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे, सहाय्य शिक्षक श्री.सावंत एस आर,श्री.काणेकर व्ही डी, श्रीमती सानिका बाक्रे, श्रीमती शितल धुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.सर्व विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक श्री.वामन तर्फे यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!