*कोंकण Express*
*कावळा करतो काव! काव!! एकतर झाड लाव!*
*माकडा माकडा हुप! हुप! झाडे लावू खुप खुप!*
*शिक्षक भारतीचे चौकुळ येथे रॅली काढण्यातून ५० हुण झाडांचे वृक्षारोपण….*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
झाडे लावा! झाडे जगवा, पर्यावरण रक्षण,आमची जबाबदारी!,कोण म्हणतं लावणार नाही!, लावल्याशिवाय राहणार नाही!…माकडा माकडा! हुप हुप!! झाडे लावू खुप खुप!
कावळा करतो काव काव! माणसा एक तर झाड लाव!!
अशा घोषणांनी सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गाव शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या शिलेदारांनी दणाणून सोडले.औचित्य होते,चौकुळ हायस्कूल व श्रीदेवी सातेरी मंदिर परिसरात वृक्षारोपणाचे.
जिल्हाभरातून आलेल्या 44 शिक्षक भरतीच्या शिलेदारांनी 50 पेक्षा अधिक विविध प्रकारच्या वृक्षांची रोपटे हातात घेऊन भर पावसात चौकुळ मराठीशाळा- खासकिलवाडी ते चौकुळ हायस्कूल पर्यंत रॅली काढून ग्रामस्थांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
ही रॅली शिक्षक भारती सिंधुदुर्गचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह संजय वेतुरेकर,राज्य प्रतिनिधी सी.डी.चव्हाण,माजी जिल्हा सचिव सुरेश चौकेकर, जिल्हा पदाधिकारी कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर,सचिव समीर परब,संघटक आकाश पारकर,आनंद राठ्ये, उपाध्यक्ष जनार्दन शेळके,दिपक तारी व अन्य ४० पेक्षा जिल्हा पदाधिकार व तालुका पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हावे व पृथ्वीचे संतुलन राखले जावे,वाढलेले तापमान कमी व्हावे हा संदेश देण्यासाठी तसेच ग्रीस्कूल कल्पना अमलात आणण्यासाठी चौकुळ हायस्कूलमध्ये ५० पेक्षा अधिक विविध जातींच्या वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर देवी सातेरी मंदिर परिसरात दोन झाडांचे वृक्षारोपण गावचे गावकार यांच्या उपस्थितीत शिक्षक भारतीच्या शिलेदारांनी केले व पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.

