विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

*कोंकण Express*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुरकर गुरुजी चॅरिटेबल स्ट्रस्टचे संस्थापक प्रा दिवाकर मुरकर सर यांच्या सुनबाईंच्या वाढ दिवसा निमित्त विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ भेट म्हणून वाटण्यात आली सामाजिक दायित्व या भावनेने मुरकर कुटुंबिय नेहमीच शैक्षणिक मदत करण्यात अग्रेसर असतात याचाच एक भाग म्हणून प्रा . दिवाकर मुरकर सरांनी सुनबाईंच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यामंदिर शाळेच्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणास मदत व्हावी आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून शैक्षणिक साहित्य वाटून वाढदिवस साजरा केला . पाचवी ते आठवीचे विद्यार्थी आनंदाने शैक्षणिक साहित्य स्वीकारून अधिक शिक्षण घेऊन प्रगती करतील अशी अपेक्षा व्यक्त केली
यावेळी स्ट्रस्टचे चेअरमन आदरणीय वणवे सरांनी दातृत्वाची भूमिका स्पष्ट केली प्रा . मुरकर सरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी प्रा . मुरकर सर व त्यांच्या सुनबाईंचे दातृत्वा बद्दल आभार मानले यावेळी पर्यवेक्षक सौ जाधव मॅडम व सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!