*कोंकण Express*
*गणपतीसाना पुलाचे काम शीघ्रगतीने पूर्णत्वाकडे..*
*सार्बावजनिक धकामच्या कार्यकारी अभियंत्यांकडून समाधान*
*जून अखेरपर्यंत पूल वाहतुकीला खुला करण्याचा प्रयत्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
गेल्या अनेक वर्षांच्या मागणीनंतर कणकवली शहर आणि जानवली या दोन गावांना जोडणाऱ्या जानवली नदीपात्रातील गणपतीसाना येथील मोठ्या पुलाचे काम अंतिम टप्यात आले आहे. पुढील आठवड्यापर्यंत या पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण होऊन जूनअखेपर्यंत पूल वाहतुकीला खुला करण्याचा प्रयत्न राहणार आहे. ८ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर असलेल्या या पुलाचे काम ठेकेदाराने अत्यंत जलदगतीने पूर्ण करत शेवटच्या टप्यात आणल्याने नागरिकांतूनही समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कणकवलीतून जानवली किंवा त्यापलिकडील भागात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. उन्हाळ्याच्या कालावधीत याच गणपतीसान
येथे बंधारा बांधून वाहतूक होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून येथे पूल व्हावा म्हणून सर्वांनीच प्रयत्न केले. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळाले नव्हते. मात्र, आता जानवली नदीवरील नव्या पुलामुळे येथील रहिवाशांना जवळचा आणि नवा मार्ग खुला झाला आहे. कणकवली शहरवासीयांनाही जानवली, साकेडी, हुंबरट, करुळ आदी गावांमध्ये
जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. गेल्या दहा वर्षापासून जानवली नदीपात्रात पूल व्हावा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून या पुलाचे काम साकारत आहे. बांधकाममंत्री खींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सूचनांनंतर सर्व्हेक्षण व आवश्यक कामे पूर्ण झाल्यावर सार्वजनिक
बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तांत्रिक आराखडा मंजुरीसाठी सादर केला होता. डिसेंबर २०२४ मध्ये या पुलासाठी हिवाळी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. मार्च २०२४ मध्ये या पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाली त्यावेळी कामाच्या ठिकाणी पाणीही मोठ्या प्रमाणात होते. मात्र तरीही हे काम अत्यंत गतीने सुरू ठेवण्यात आले.
शहरातील गणपतीसाना येथे जानवली नदीपात्रात उभारणी होत असलेला हा पूल ८० मीटर लांब आणि ११.६७ मीटर रुंदीचा आहे. यात एकूण सात गाळे आहेत. यापैकी पाच गाळ्यांचे स्लॅब २४ मेपर्यंत पूर्ण झाले असून ३० मेपर्यंत सातही स्लॅब पूर्ण करण्यात येणार आहेत. मध्यंतरी काही दिवस हरकुळ धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पाणी पातळी वाढून कामात काहीसा व्यत्यय आला.

