फोंडाघाट महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

*कोंकण Express*

*फोंडाघाट महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. त्याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी श्री. चंद्रशेखर लिंग्रस उपस्थित होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, वृक्ष हे आपले खरे मित्र आहेत. ते विनामूल्य आपल्याला नैसर्गिक अधिवास देतात. पिंपळ, वड, कडूलिंब सारखे वृक्ष तर शंभर टक्के ऑक्सिजन देतात. त्यामुळे महाविद्यालयाचा परिसर विविध झाडांनी समृद्ध करणे आवश्यक आहे. आपण सर्व विद्यार्थ्यांनी यावरच न थांबता आपल्या घरच्या परिसरातील झाडांची जोपासना करावी व त्याचबरोबर नवीन झाडे लावून संवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ संचालक श्री. रंजन नेरूरकर म्हणाले की, फक्त झाडे लावून उपयोग नसतो तर ती जगवली पाहिजेत. आपण जसा घरासभोवतलाचा परिसर जगवतो, त्याच आत्मीयतेने महाविद्यालयाचा परिसरही जगवला पाहिजे. विद्यार्थ्यांनी निसर्गाप्रति कृतज्ञ राहिले पाहिजे. निसर्ग टिकला तरच आपण टिकणार आहोत, असे त्यांनी नमूद केले.

प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांनी सर्वांना वृक्षारोपणाच्या शुभेच्छा दिल्या व मोठया प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व एनएसएस, एनसीसी विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!