पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दिल्ली येथे शपथविधी सोहळयास अक्षय सर्वगोड उपस्थित राहून अभ्यतपुर्व सोहळयाचे मानकरी ठरले

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दिल्ली येथे शपथविधी सोहळयास अक्षय सर्वगोड उपस्थित राहून अभ्यतपुर्व सोहळयाचे मानकरी ठरले

*कोकण Express*

*पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दिल्ली येथे शपथविधी सोहळयास अक्षय सर्वगोड उपस्थित राहून अभ्यतपुर्व सोहळयाचे मानकरी ठरले*

*पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा*

देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी तिसऱ्यांदा दी 9 जून 2024 रोजी पंतप्रधाअभ्यतपुर्व सोहळयाचे मानकरी ठरलान पदाची शपथ घेतली. सदर शपथ विधीसाठी अभूतपूर्व सोहळासाठी देशातील आणि जगातील विविध क्षेत्रातील जवळपास 8 हजार लोक उपस्थित होते. माझा मुलगा अक्षय सर्वगोड याला सदर शपथविधी सोहळयाला उपस्थित राहण्याबाबतचे निमंत्रण भारत सरकारमार्फत देण्यात आले होते ही बाब मला आनंदाची अणि अभिमानाची आहे माझा मुलगा अक्षय सर्वगोड 9 जुन 2024 रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळयास उपस्थित राहिला आणि अभ्यतपुर्व सोहळयाचे मानकरी ठरला याचा मला सार्थ अभिमान निश्चित आहे. अक्षय चा सर्वगोड यांचा जन्म 22 सप्टेंबर 1995 रोजी झाला .22 सप्टेंबर म्हणजे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म दिवस आहे या महापुरुषांच्या जन्मदिनी अक्षय चा जन्म झाला आहे हा खरच मोठा योगायोग आहे. कर्मवीर भाऊराव पाटीलांनी महाराष्ट्रातील तळागाळातील वंचित विकलांग लोकांना शिक्षणाची मोफत सुविधा निर्माण करुन दिली. त्यामुळे महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर अणि पुढारलेल्या आहे माझ्या मुलाला पण हेच सांगणे आहे. की या थोर महापुरषांच्या जन्मदिनी तुझा जन्म झालेला आहे. तर तु ही या देशातील राष्ट्रातील विकलांग लोकांची व राष्ट्रांची सेवा करावी. अशीच अपेक्षा त्याच्या कडून राहणार आहे. तो ही स्वतः चा उद्योग सांभाळून इतराना खूप मदत करीत असतो तसेच त्यांच्या या कामांचे श्रेय म्हणुन त्याला सोहळयाचे निमंत्रण मिळाले आणि पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शपथ विधीच्या अभूतपूर्व सोहळयाचा मानकरी ठरला. ही बाब माझ्या दृष्टीकोनातुन अंत्यंत आनंदाची अभिमानची गोष्ट आहे. म्हणुन आर्वजुन म्हणावयाचे वाटते की, *पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!