_नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचा ‘जल समर्पण’चा इशारा

_नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचा ‘जल समर्पण’चा इशारा

*कोकण Express*

*_नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचा ‘जल समर्पण’चा इशारा…_*

*_▪️विविध मागण्यांसाठी कुर्ली वासीयांचे उपोषण सुरूच : जीवित हानी झाल्यास प्रशासन जबाबदार : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन_*

*कणकवली ः प्रतिनिधी*

नवीन कुर्ली ग्रामपंचायत व्हावी, पर्यायी शेत जमीन मिळावी, १८ नागरी सुविधा मिळाव्यात या मागण्यांसाठी नवी कुर्ली ग्राम विकास मंडळाचे आज ७ व्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान येत्या ४ दिवसात आपल्या मागण्यांबाबत उचित कार्यवाही न झाल्यास ५ फेब्रुवारी रोजी हे आंदोलन देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प येथे स्थलांतरित करण्यात येवून त्या ठिकाणी पूर्वसूचना न देता अचानक ” जल समर्पण ” करण्याचा निर्धार या मंडळाने केला असून या वेळी जीवित हानी झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!