एकनाथ नाडकर्णी; सावंतवाडीत झालेल्या मतदानाचे आत्मपरिक्षण करा, संजू परबांना सल्ला

एकनाथ नाडकर्णी; सावंतवाडीत झालेल्या मतदानाचे आत्मपरिक्षण करा, संजू परबांना सल्ला

*कोंकण Express*

*एकनाथ नाडकर्णी; सावंतवाडीत झालेल्या मतदानाचे आत्मपरिक्षण करा, संजू परबांना सल्ला….”

*दोडामार्ग ः प्रतिनिधी*

संजू परबांना आमदारकी पाहिजे असेल तर त्यांनी पक्षाकडे तशी मागणी करावी. उघड चर्चा करून पक्षात अंतर्गत कलह निर्माण करू नये, अशा कानपिचक्या जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा भाजप नेते एकनाथ नाडकर्णी यांनी दिल्या आहेत. राजन तेली यांच्या विरोधात काहीही वक्तव्य करण्यापेक्षा परब यांनी लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी शहरात झालेले मतदान पहावे आणि आत्मपरिक्षण करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

संजू परब यांनी आज या ठिकाणी सकाळी पत्रकार परिषद घेऊन आपण विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले. तशा प्रकारचे आदेश आपल्याला पक्षाने दिले आहेत, असे म्हटले. त्याला नाडकर्णी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यात त्यांनी असे म्हटले आहे की, परब यांनी स्टेटमेंट केले अश्या प्रकारची पद्धत भाजपात नाही, राणेंनी काल लोकसभा निवडणूक लढवताना पार्टीने ठरवलेला तोच निर्णय घेतला मग आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकत्र्याने पार्टीचे आदेश का पाळू नयेत

जसे निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभेचे भाजपचे विधानसभा प्रमुख आहेत तसेच तेली हे सावंतवाडी विधानसभेचे प्रमुख आहेत. तेली यांनी आजपर्यंत स्वतःच्या तोंडून असे काहीही वक्तव्य केलेले नाही. त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवली. त्यामुळे परब यांनी लोकसभेचे सावंतवाडी शहरातील झालेले मतदान पहावे आणि आत्मपरिक्षण करावे

आपणास जर विधानसभेची उमेदवारी पक्षाकडून पाहिजे असेल तर अशी उघड चर्चा करण्यापेक्षा पक्षाच्या नेतृत्वासोबत चर्चा करावी. मला सुद्धा राजकारणामध्ये साधारण पस्तीस वर्ष झाली. तरी मी अजून कोणतीही अपेक्षा केली नाही. तुम्ही वारंवार अश्याप्रकारच्या बातम्या देऊन

पक्षा मध्ये कलह निर्माण करू नये. पक्ष देईल तो आदेश सवाँनी पाळला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!