*कोकण Express*
*अंगणवाडी साठी स्वतंत्र वर्गखोली मिळवून देणार ; नितेश राणे यांचे आश्वासन….*
*वेंगुर्ला कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक शाळेच्या नूतन इमारतीचे शानदार भूमिपूजन*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या पाच वर्गखोल्यासाठी ५३ लाख रुपये मंजूर असून या नुतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आमदार नितेश राणे याच्या हस्ते करण्यात आला. या शाळेच्या शिक्षक, पालकांनी अंगणवाडीसाठी वर्गखोलीची आपल्याकडे मागणी केली असून मंजूर पाच वर्गखोल्यांचे बांधकाम चालू असतानाच आपण अंगणवाडी वर्गखोलीसाठीहि निधी मंजूर करेन असे आश्वासन आम. नितेश राणे यांनी यावेळी दिले.
वेंगुर्ले कॅम्प येथील शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळेच्या नुतन इमारतीचे भुमिपूजन आमदार नितेश राणे याच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य दादा कुबल, प्रितेश राऊळ, नगरसेविका शितल आंगगचेकर, कृपा गिरप मोंडकर, बाबली वायंगणकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, दादा केळुसकर, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मनिष दळवी, तसेच विक्रम गावडे, सुरेंद्र चव्हाण, रविद्र शिरसाट, शाळेच्या मुख्याद्यापिका संजिवनी कांडरकर,आगणवडीच्या स्मिता कोणेकर, शिक्षिका अरुणा देसाई, मेधा कालमेग, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जगताप, अशोक आरोलकर, वेंगुर्ले पं. स. चे कर्मचारी मुकूल सातार्डेकर, महेश नाईक, सेवानिवृlत मुख्याद्यापक सत्यवान पेडणेकर, आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात वेंगुर्ले हायस्कुलचे माजी मुख्याद्यापक एस. एस. काळे म्हणाले की, शिवाजी प्रागतिक प्राथमिक शाळा हि सुरुवातीस वेंगुर्ले हायस्कुलच्या एका वर्गखोलीत भरत होती. त्यानंतर ती गवळीवाडा येथील खाजगी जागेत व नंतर न. प. च्या जागेत गेली. त्यावेळी हि शाळा हस्तान्तरीत करण्यात न आल्याने हि शाळा भाडेतत्वावर सुरु होती. मात्र आता जि. प. सदस्य दादा कुबल याच्या प्रयlनामुळे या शाळेच्या पाच वर्गखोल्यासाठी 53 लाख मंजूर असून आज हि शाळा जि. प. च्या मालकीची झाली आहे.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीतर्फे आमदार नितेश राणे याचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
दरम्यान दादा कुबल यानी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जयराम वायंगणकर तर आभार खानोलकर यानी मानले.