मुुंबई-वांद्रे येथे ८ जूनला सूर्यकांत मालुसरे यांच्या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन; निमंत्रितांचे कवि संमेलन

मुुंबई-वांद्रे येथे ८ जूनला सूर्यकांत मालुसरे यांच्या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन; निमंत्रितांचे कवि संमेलन

*कोंकण Express*

*मुुंबई-वांद्रे येथे ८ जूनला सूर्यकांत मालुसरे यांच्या बाल कवितासंग्रहाचे प्रकाशन; निमंत्रितांचे कवि संमेलन*

*मुंबई:*

नॅशनल लायब्ररी, वांद्रे, कोमसाप, विलेपार्ले शाखा व वंदना प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने
पुस्तक प्रकाशन समारंभ व निमंत्रितांचे कवि संमेलन आयोजित केले आहे.
बालसाहित्यकार कविवर्य सूर्यकांत मालुसरे यांच्या “चांद्रयान” बालकवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार ८ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजता नॅशनल लायब्ररी सभागृह, दुसरा मजला, एस. व्ही. रोड, वांद्रे ( पश्चिम ), मुंबई ४०००५१ येथे आयोजित केला आहे .
या समारंभाला नमिता कीर, कोमसाप, केंद्रीय अध्यक्षा उद्घाटक या नात्याने उपस्थित राहणार आहेत. डॉ. दत्ता पवार, ज्येष्ठ साहित्यिक अध्यक्ष या नात्याने उपस्थित राहणार आहेत. एकनाथ आव्हाड, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बालसाहित्यकार, मोहनदास मुंगळे, माजी दूरदर्शन निर्माता, डॉ. कृष्णा नाईक,ज्येष्ठ साहित्यिक, अभिनेते व दिग्दर्शक, संतोष खाडये, लेखक व कवी , व डॉ. सुनील सावंत, ज्येष्ठ साहित्यिक प्रमुख वक्ते या नात्याने उपस्थित राहणार आहेत.
त्याचवेळी कवी शिवाजी गावडे यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कवि संमेलन होणार आहे. त्यात खालील निमंत्रित कवी व कवयित्री सहभागी होणार आहेत.
संतोष खाडये, डॉ. मनोज वराडे, सोनाली जगताप, पुष्पा कोल्हे, संजय वामन वेदक, रमेश सावंत, जयश्री संगीतराव, चंद्रकांत कवळी, कमलाकर राऊत, मकरंद वांगणेकर, अनिल खेडेकर, नीमा चिटणीस आणि पूजा अभय काळे.
प्रमोद महाडिक, कार्यवाह, नॅशनल लायब्ररी, वांद्रे व ॲड. यशवंत कदम, ज्येष्ठ साहित्यिक यांची प्रमुख उपस्थिती राहील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री मनीषा घेवडे करणार आहेत.
रसिकांनी समारंभाचे आग्रहाचे आमंत्रण आहे. प्रकाशन सोहळ्याचा व मराठी कवितांचा आनंद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन स्नेहांकित, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनील सावंत व आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!