वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित

*कोंकण Express*

*वाघेरी ग्रामविकास मंडळ, मुंबई यांच्या वतीने अभिनेत्री अक्षता कांबळी सन्मानित*

गेली पंधरा वर्षे सामाजिक आणि कला क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अभिनेत्री सौ अक्षता कांबळी म्हणजेच पूर्वाश्रमीच्या (सीमा मोहन रावराणे) यांच्या कार्याची दखल घेत वाघेरी ग्रामविकास मंडळ मुंबई यांच्या वतीने अभिनेत्री अक्षता कांबळी यांना शाल श्रीफळ पुष्गुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक जी राणे,खजिनदार सूर्यकांतजी गुरव,सुधाकरजी राणे,तसेच माझी सरपंच संतोष जी राणे आणि ग्रामस्थ यांचे कांबळी यांनी मनापासून आभार व्यक्त केले.आपल्याला हा माहेरचा स्तकार सन्मान एखाद्या पुरस्कार पेक्षा मोठा आहे अस म्हणत याप्रसंगी आपले आई वडील हयात असते तर आनंद द्विगुणित झाला असता अशी खंत व्यक्त करत अक्षता कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वांना धन्यवाद दिले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!