*कोंकण Express to*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज साहेब ठाकरे यांचे उद्या बांदा या ठिकाणी जंगी स्वागत होणार आहे विधानसभा सचिव गुरुदास गवंडे*
*बांदा प्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून महायुतीचे उमेदवार सन्माननीय श्री नारायण राणे यांच्या करिता उद्या सायंकाळी ठीक ०६:०० वाजता कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोर मनसे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. तत्पूर्वी दुपारी ठीक ०३:०० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बांदा नगरीत भव्य दिव्य असे स्वागत होणार आहे तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सावंतवाडी विधानसभेतील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी विधानसभा सचिव गुरुदास गवंडे यांनी केले आहे.

