जाहीर सभे वेळीच उद्धव ठाकरे यांना उबाठा सैनिकांनी दाखवला ठेंगा

जाहीर सभे वेळीच उद्धव ठाकरे यांना उबाठा सैनिकांनी दाखवला ठेंगा

*कोंकण Express*

*जाहीर सभे वेळीच उद्धव ठाकरे यांना उबाठा सैनिकांनी दाखवला ठेंगा*

*उबाठा नेत्यांची झाली नाचक्की*

*देवगड – गोवळ मधील उ.बा.ठा चे उपसरपंच सत्यवान जंगले यांनी केला भाजपमध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांच्या गोवळ गावातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून झाले प्रभावित*

*कणकवली ः प्रतिनिधी*

देवगड तालुक्यातील गोवळ मधील उबाठाचे कार्यकर्ते चंद्रकांत जंगले, सत्यवान जंगले, रुपेश जागळी, विजू जंगले, दिनेश कोकरे, सत्यवान तेली यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे ठरवलं असून त्यामुळे गोवळ गावातील ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो आहे. कणकवलीत जाहीर सभा सुरू असतानाच ओम गणेश निवासस्थानी येऊन या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश पक्षप्रमुखासाठी फार मोठा धक्का मानला जातो. जाहीर सभा सुरू असतानाच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन भाजप प्रवेश केल्याने मोठी नाचक्की उद्धव ठाकरे यांची झाली आहे.

यावेळी आमदार नितेश राणे बंड्या नारकर, उदय पाटील, पंढरी वायंगणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!