तुम्ही फक्त हाक द्या.! आम्ही साथ देवू – आम.नितेश राणे

तुम्ही फक्त हाक द्या.! आम्ही साथ देवू – आम.नितेश राणे

*कोकण Express*

 *तुम्ही फक्त हाक द्या.! आम्ही साथ देवू – आम.नितेश राणे…!*

*हरकुळ बु. येथील विकासकामाचा शुभारंभ….!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

हरकूळ बुद्रुक हा जि.प. मतदारसंघ माजी.मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बाल्लेकिल्ला आहे. येथील जनता हि राणे साहेबांवर प्रेम व विश्वास ठेवणारी आहे. तुम्ही फक्त हाक द्या आम्ही साथ देवू. हरकूळ बुद्रुकबौद्धवाडीतील जी विकासकामे असतील ती येत्या काळात पूर्ण करू असा विश्वास आम.नितेश राणे यांनी व्यक्त केला.

हरकूळ बुद्रुक बौद्धवाडीतील दलित सुधारकर योजना अंतर्गत पिण्याच्या टाकीचाशुभारंभ आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत तर बाबा वर्देकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या पिण्याच्या टाकीच्या बांधकामासाठी आपल्या मालकीची २ गुंठे जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल ग्रामस्थ पिलाजी धामणकर यांचा आम.नितेश राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आम.नितेश राणे बोलत होते.

यावेळी मा. जि.प.अध्यक्ष संदेश सावंत, उपसभापती दिव्या पेडणेकर, सरपंच गौशिया पटेल, भाजपा कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,माजी उपसभापती बुलंद पटेल, राजू पेडणेकर,रमेश पावसकर,उपसरपंच चंद्रकांत परब,ग्रा.प.सदस्य सविता गावकर,बाळा गावकर,संतोष तांबे,संजय पाटील,मोहन तांबे,बापट किंजवडेकर,महेंद्र धामणकर,सतीश धामणकर,वीरेंद्र धामणकर,दिलीप कासले,आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!