महायुतीचा उमेदवार ३ लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल

महायुतीचा उमेदवार ३ लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल

*कोंकण Express*

*महायुतीचा उमेदवार ३ लाखाच्या मताधिक्याने विजयी होईल…*

*विशाल परब; सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेतील मतदारांचा मोदी सरकारवर विश्वास…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग- रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार अडीच ते तीन लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखण्यात आली आहे. सर्वजण एकजुटीने कामाला लागले आहेत. असा दावा भाजपचे युवा नेते तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे व्यक्त केला.

महायुतीचा उमेदवार येत्या दोन-तीन दिवसात जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होईल. मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी अनेक योजना राबविण्यात आल्यामुळे येथील मतदारांचा भाजपावर विश्वास आहे त्यामुळे “चारसौ पार”चा फॉर्मूला निश्चित यशस्वी होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजप वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, ‘प्रथम राष्ट्र नंतर पक्ष व शेवटी स्वतः’ या तत्त्वावर काम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा आज ४४ वा वर्धापनदिन

असून या निमित्त या पक्षाच्या व संघटनेच्या निर्मितीसाठी व वाढीसाठी अनेकांनी समर्पण केले. त्यांच्या समर्पणातूनच आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते निर्माण झाले आहेत. त्या सर्वांना आपण विनम्रतापूर्वक बंदन करतो. भारतीय जनता पक्ष हा आज केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. रत्नागिरी मतदारसंघाचा उमेदवार अद्याप निश्चित झाला नसला तरी येत्या दोन-तीन दिवसात त्याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे

महायुतीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी मतदार संघामध्ये तळागाळात जाऊन प्रचार करणार आहे या ठिकाणी महायुतीची ताकद लक्षात घेता अडीच ते तीन लाखाच्या मताधिक्य घेऊन उमेदवार निवडून येणार आहे असा विश्वास व्यक्त करत केंद्र सरकारच्या माध्यमातून दहा वर्षातील केलेली कामे, सर्वसामान्य लोकांसाठी राबविलेल्या विविध योजना व गोरगरिबांसाठी केलेले कार्य आमच्यासारखे कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत नेणार आहेत. भविष्यातही या देशातील उरली सुरली गरिबी दूर होऊन प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी आमचा पक्ष निश्चितच काम करणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!