कळसुली येथील मठात 10 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा

कळसुली येथील मठात 10 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा

*कोंकण Express*

*कळसुली येथील मठात 10 रोजी श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

प्रेमदया प्रतिष्ठान मुंबई व श्री स्वामी समर्थ मठ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 10 एप्रिल रोजी कळसुली येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते 8.30 वा. यावेळेत गणेश पूजन, स्वामींचे नित्य पूजन, पादूका पूजन, सकाळी 9 ते 10.30 वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी 11 ते दु. 3 वा. नामस्मरण, स्वामींचा पालखी मिरवणूक सोहळा, महाआरती, महाप्रसाद, दु. 3.30 वा. ते सायं. 6 वा. यावेळेत स्थानिक भजन, सायं. 7 ते 8.30 वा. पंचक्रोशीतील स्थानिक वारकर्‍यांची दिंडी, रात्री 8.30 वा. हभप विश्वनाथ महाराज गवंडळकर यांचे कीर्तन, रात्री 10 वा. अमृत गंगा हे पौराणिक दशावतारी नाटक होणार आहे. तरी या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहून तीर्थप्रसाद, महाप्रसाद व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रेमदया प्रतिष्ठान व स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत सावंत तसेच स्वामी सेवेकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!