निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर मंडप व्यवस्था

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर मंडप व्यवस्था

*कोंकण Express*

*निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या संपर्क कार्यालयासमोर मंडप व्यवस्था*

*लोकसभेच्या निवडणुकीला भाजपकडून प्रचाराला सुरुवात..*

*कणकवली ः प्रतिनिधी*

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अधिकृत महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. तरीदेखील भारतीय जनता पार्टी कडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार प्रचार बैठका व तयारी वेगवान सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवली येथील कार्यालयासमोर निवडणूक प्रचारार्थ मंडप व्यवस्था तसेच ओम गणेश निवासस्थानाबाहेर देखील मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बंडखोरी टाळण्यासाठीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उमेदवारी जाहीर करताना वेळ घेतला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भारतीय जनता पार्टी कडून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. जरी हा मतदारसंघ महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेचा असला तरी शिवसेनेची ताकद आणि भारतीय जनता पार्टीची ताकद पाहता भाजपलाच हा मतदारसंघ मिळावा, असा दावा भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी केला आहे. खा. विनायक राऊत यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार असावा अशी मागणी असल्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांमध्ये बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण व ना. नारायण राणेंच्या, भाजपच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या बैठका पार पडल्या. तसेच भाजपच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या समवेत स्थानिक आमदार नितेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेतल्या जात आहेत. याचाच अर्थ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून लवकरच त्यावर शिक्का मोर्तब होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!