निवडणूका आल्यावरच आ. नितेश राणेंना कौंटुंबिक संबंध आठवतात ; सतीश सावंत यांचा टोला

निवडणूका आल्यावरच आ. नितेश राणेंना कौंटुंबिक संबंध आठवतात ; सतीश सावंत यांचा टोला

*कोंकण Express*

*निवडणुकीचे तिकीट राणेंना मिळाले तर सामंत कुटुंबीयांची मदत लागणार…*

*निवडणूका आल्यावरच आ. नितेश राणेंना कौंटुंबिक संबंध आठवतात ; सतीश सावंत यांचा टोला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गरजे पुरता वापर करा आणि फेकून द्या हिच राक्षसी प्रवृत्ती आम. नितेश राणे यांची आहे. आणि म्हणूनच या लोकसभा निवडणूकीमध्ये नारायण राणेंना जर तिकीट मिळाले तर त्यांना किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज लागणार आहे. म्हणून त्यांना गोजारण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडून चालु आहेत, असा टोला ठाकरे शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी लगावला आहे.

सतीश सावंत म्हणाले, नितेश राणे यांनी काल सांगितले कि मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहोत तसेच किरण आणि उदय सामंत हे आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावर निवडणूका येण्यापूर्वी टिका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि दोन दिवसापूर्वी नारायण राणे हे किरण सामंत यांच्या बद्दल ज्याकाही गोष्टींबद्दल राणे बोलले होते, जर ते तुमच्या कुटुंबातील सदस्य होते मग अशी टिका करणे ही प्रवृत्ती आहे का? असा सवाल करताना सतीश सावंत म्हणाले, जर लोकसभेचे तिकीट मिळाले तर रत्नागिरीत किरण सामंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार आहे. म्हणून किरण सामंत व सामंत कुटुंबियांना गोजारण्याचे प्रयत्न नितेश राणेंचे चालु आहेत. ज्या ज्या वेळी किरण सामंत यांनी नितेश राणेंची भेट घेण्याचे ठरवले त्या त्या वेळी भेट नाकारण्याचे काम सुध्दा नितेश राणे यांनी केले. जर ते तुमच्या कुटुंबातील सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली ? याचेही उत्तर नितेश राणे यांनी द्यावे. रत्नागिरीतील मते आपल्याला मिळाली पाहिजेत, किरण सामंत आणि उदय सामंत हे आपल्या विरोधात जाता कामा नयेत. आपल्याला जर याठिकाणी निवडणूक लढवायची असेल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे. म्हणून नितेश राणे सांगतात की ते, आमच्या कुटुंबातील आहेत. आता या निवडणूकीपूरते नितेश राणे आणि राणे कुटुंबियांना प्रत्येक जण आपल्या कुटुंबातीलच वाटणार आहे. निवडणूक झाली की ते त्यांना साधी ओळखही दाखवणार नाहीत. आणि त्यांच्या सुखः दुखाः मध्ये सामीलही होणार नाहीत असे सतीश सावंत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!