*कोंकण Express*
*संदेश सावंत यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम – ना. नारायण राणे*
*संदेश सावंत यांनी पुढील काळात सामाजिक बांधिलकीच काम अविरत ठेवावे; संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोट्या सावंत यांचा वाढदिवस उत्साहात*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संदेश सावंत ५० वर्षाचे झाले याच मला कुतुहल आहे, आश्चर्य नाही. त्यावेळी मी ९० ला इथे आलो आणि त्यावेळीला विधानसभेच्या निवडणूकीचे वातावरण होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी मला मला बोलावून कोकणात जाऊन कणकवली मतदार संघातून निवडणूक लढण्यासाठी मला सांगण्यात आले. त्यावेळी मी कोकणात आलो आणि संदेश सावंत यांच्याशी भेट झाली. तेव्हाचे माझे प्रामाणिक कार्यकर्ते ते आज माझ्या बरोबर आहेत. जे माझ्या गाडीत असायचे, दादा मी कधीच सोडणार नाही सांगायचे ते केव्हा जय महाराष्ट्र ते समजलेच नाही. मला कोणताच फरक पडला नाही. मात्र संदेश सावंत यांनी राणे कुटुंबियांना सातत्याने साथ दिली आणि श्रध्दाही ठेवली. संदेश सावंत यांच्याबद्दल प्रेम आणि आपुलकी कायम असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. तसेच संदेश सावंत यांनी पुढील काळात सामाजिक बांधिलकीच काम अविरत ठेवावे अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोट्या सावंत यांच्या सुवर्णमहोत्सवी यांचा वाढदिवसानिमित्त ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, निलमताई राणे, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित केक कापण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, डॉ. मिलींद कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री, महेश गरव, संदिप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सुरेश सावंत, प्रकाश सावंत, समीर प्रभुगांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर, आदींसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संदेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला. तसेच भलामोठा पुष्पहार घालण्यात आला.
ना. नारायण राणे म्हणाले, संदेश सावंत हे प्रत्येक वेळी जनतेसाठी काम करत असतात. आणि त्यांच्या ज्या काही समस्या असतील सामाजिक आणि राजकीय असतात. अविरतपणे काम करत राहण्याची कार्यपध्दती त्यांची आहे. एक माणूस म्हणून त्याची कमाई ही समोरच्या लोकांच्या उपस्थितीवरुन दिसत आहे. माणसाची श्रीमंती कशी ओळखावी ती त्याच घर असत त्या घराबाहेर सकाळी त्याच्या घराच्या बाहेर जेवढ्या चपल्या जास्त तेवढी जास्त त्याची श्रीमंती आहे. गोट्या सावंत कष्ट करणारा मुलगा आहे. मी त्याला काय धावताना आणि पळताना पाहिले. कोणताना कोणतातरी विषय घेवून यायचा आणि कोणताना कोणता वाद निर्माण करायचा पण काहीतरी करण्याच्या मानसिकतेत असतो. या पुढील काळात त्याने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच काम करावे.
आमदार नितेश राणे म्हणाले, मला अस वाटतं की नारायण राणे व राणे कुटुंबिय फार नशीबवान आहेत, त्यांना संदेश सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा सहवास लाभला. आणि या अशा काळात संदेश सावंत यांसारखे कार्यकर्ते मिळणे फार अवघड आहे. संदेश सावंत हे बाकी कुठल्याही विषयात तडजोड करु शकतात, मात्र नारायण राणे असो आणि त्यांच्यावरची निष्ठेबाबत तडजोड करण्यासाठी हे कधीच तयार होत नाहीत.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, प्रत्येक कार्यकत्र्यांने राणे साहेबांना प्रत्येक बूध वर 85 टक्के मताधिक्य देण्याचे काम आपण सर्वांनी करावे. आणि कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलाय ते कार्यकर्ते नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते पहिल्यापासून आहेत. आणि मी माझं भाग्य समजतो की, ज्या देवावर मी 33 वर्षे मी प्रामाणिकपणे प्रेम करतोय ते माझ्या 50 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या सोबत उपस्थित आहेत. याच्यापेक्षा मला मोठं काही नाही. आणि त्यातच मी खुप समाधानी आहे, असे याठिकाणी सांगतो.
आता गोठ्या म्हणायचे सर्वांनी सोडून द्या निलमताई राणे
संदेश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त एक गोष्ट सांगायची आहे की, कारण हा संदेश उर्फ गोट्या सावंत ह्याला गोट्या म्हणण फक्त सोडायचे आहे. कारण 50 वर्षाचा गोट्या कधीचा नसतो. यापुढे सर्वांना त्याला संदेश सावंत म्हणायचे असे आवाहन निलमताई राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

