माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई

माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई

*कोंकण Express*

*माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोई*

*सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या हस्ते पाणपोई चे उद्घाटन*

माऊली मित्रमंडळाच्या वतीने कणकवली पटवर्धन चौक येथिल रिक्षा स्टँड नंबर १ येथे पाणपोईचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर आणि माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी कणकवली रिक्षा स्टँड नंबर 1 चे चालक मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पाणपोई उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले की,पूर्वीच्या काळात रिक्षावाला बदनाम होत होता. आता रिक्षावाला म्हणजे एक समाजसेवक आहे. तो प्रत्येकाला मदत करू शकतो. तुमच्याकडे पैसे असो वा नसो तुम्हाला तो घरी पोचवू शकतो. असा रिक्षावाला आज कणकवलीत प्रत्येक ठिकाणीं किंवा जिल्ह्यातील असतील तरी रिक्षावाला ही संकल्पना बदललेली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर, सुभाष उबाळे, अविनाश गावडे भगवान कासले प्रभाकर कदम, प्रसाद उगवेकर लक्ष्मण महाडिक, प्रसाद पाताडे, योगेश रंगराव पवार , ज्ञानदेव मोडक, संतोष चव्हाण, बाबुराव घाडीगावकर, हेमंत नाडकर्णी, विशाल रजपूत, सईद नाईक जमिल कुरैशी, नुरमहम्मद शेख , देवराज जाधव, पंडित करंबेळकर, ऑटो रिक्षा चालक अध्यक्ष गजानन लाड ,उपाध्यक्ष संदीप कदम ,खजिनदार मंगेश सावंत, सल्लागार भगवान दळवी ,सचिव असिफ बागवान, सह आदी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आम्ही रिक्षा व्यवसायातून पुढे आलो आहोत. आज नाना विविध क्षेत्रात तुमच्याच आशीर्वादाने कार्यक्रम करत असल्याचे माऊली मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!