केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या कामाचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या कामाचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन

*कोंकण Express*

*केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर झालेल्या कामाचे सरपंचांच्या हस्ते भूमिपूजन*

केंद्रीय मंत्री नाम.नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून मंजुर *वायंगणी ग्रामपंचायत हद्दीतील श्री गणेश मंदिर तेंडोली जोड रस्ता ग्रामा ६५ खडीकरण डांबरीकरण करणे ता. वेंगुर्ला* ” या कामाचा शुभारंभ *रविवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ – ००* वाजता वायंगणी गावचे सरपंच अवि दुतोंडकर यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी वायंगणी गावच्या विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच अवि दुतोंडकर यांनी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांचे आभार मानले .
या शुभारंभ प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक,ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , उपसरपंच रविंद्र धोंड , ग्रामपंचायत सदस्य विनु मठकर – सौ.राखी धोंड – सौ. गोवेकर – सौ.सविता परब , बुथ प्रमुख हर्षद साळगावकर व बाळा धोंड , राकेश धोंड ,प्रथमेश धोंड , प्रशांत सावंत , मधुकर सुर्वे , विठ्ठल सुर्वे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेलीसाहेब यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला असून , या कार्यक्रमास भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे …..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!