कासार्डे ते तळेरेत जंगी प्रभातफेरी : संत,थोर नेत्यांच्या विविध चित्ररथाने वेधले लक्ष

कासार्डे ते तळेरेत जंगी प्रभातफेरी : संत,थोर नेत्यांच्या विविध चित्ररथाने वेधले लक्ष

*कोंकण Express*

*कासार्डे ते तळेरेत जंगी प्रभातफेरी : संत,थोर नेत्यांच्या विविध चित्ररथाने वेधले लक्ष*

*कासार्डे विद्यालयाचा प्रजासत्ताकदिनी स्तुत्य उपक्रम*

*कासार्डे प्रतिनिधी :संजय भोसले*

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कासार्डे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कासार्डे हायस्कूल ते तळेरे एसटी स्टँड पर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून प्रभात फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये विविध संतांचे,थोर नेत्यांची ,शुरवीर सैनिक आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांची हुबेहूब वेशभूषा केलेले विद्यार्थी ट्रॅक्टर आणि चिपवर बसुन सजविलेले चित्ररथ तसेच एनसीसी, ज्युदो कराटे गणवेशातील विद्यार्थी प्रभातफेरीत सर्वात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.भारत माता, की जय! वंदे मातरम!, जय जवान, जय किसान! प्रजासत्ताक दिन चिरायु होवो!,आमचे संविधान! आमचा अभिमान!, यासारख्या अनेक देशभक्तीपर घोषणांनी विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. या रॅलीचे ठिक ठिकाणी ग्रामस्थांनी स्वागत करीत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोड तेळेरे बसस्थानक समोरील ब्रीजखाली छ.शिवाजी महाराजांचा देखावा सादर केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘अफजलखानाचा वधाचा प्रसंग’ अप्रतिम सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली. या ठिकाणी तळेरेत व्यापारी संघटना,रिक्षा संघटना,इतर संघटना आणि ग्रा.प. तळेरे च्यावतीने या रॅलीचे विशेष स्वागत करीत सहकार्य केले.
या सादरीकरणानंतर सदर प्रभात फेरी देशभक्ती गाण्याच्या तालावर घोषणा देत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवरून परत कासार्डे विद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या रॅलीत कासार्डे शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.तत्पूर्वी विद्यालयात कासार्डे विकास मंडळ मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर यांच्याहस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाला. याप्रसंगी त्यांनी आणकार्याध्यक्ष संजय पाताडे,माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत विशेष मार्गदर्शन केले.या ध्वजारोहण कार्यक्रमला कासार्डे विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी तसेच स्कुल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर व इतर पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधी,प्रतिष्ठीत ग्रामस्थ, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. एनसीसीचे शानदार संचलन:-
दरम्यान एनसीसीच्या
विद्यार्थ्यांनी यशवंत परब व ऋषिकेश खटावकर या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार प्रात्यक्षिके सादर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र राऊळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!