कणकवली मध्ये जिल्हाधिकारी यांचा सन्मान

कणकवली मध्ये जिल्हाधिकारी यांचा सन्मान

*कोंकण Express*

*कणकवली मध्ये जिल्हाधिकारी यांचा सन्मान*

*आज दिनांक २५/०१/२०२४ रोजी “राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने” या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. किशोर तावडे साहेब उपस्थित होते,

*यावेळी जेष्ठ पत्रकार अशोक काका करंबेळकर यांच्या संकल्पनेतून,माऊली मित्र मंडळ, जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत,अशोक काका करंबेळकर यांचे हस्ते, सल्लागार दादा कुडतरकर, संजय मालंडकर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,

*यावेळी जिल्हाधिकारी यांनी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या कार्याची दखल घेऊन,आपले कार्य कौतुकास्पद आहे, असे म्हटले,

*यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे पद्मश्री श्री परशुराम गंगावणे उपस्थितीत होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!