ओझरम सेवा मंडळाचे स्नेहसंम्मेलन धडाक्यात साजरे झाले.

ओझरम सेवा मंडळाचे स्नेहसंम्मेलन धडाक्यात साजरे झाले.

*कोंकण Express*

*ओझरम सेवा मंडळाचे स्नेहसंम्मेलन धडाक्यात साजरे झाले.*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

ओझरम सेवा मंडळ आयोजित मुंबईस्थित रहिवाशांचे स्नेहसंमेलन आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मुंबई, दादर येथे उत्साहात पार पडला. यावेळी ओझरम मुंबईस्थित रहिवाशी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच सरस्वतीपूजनाने करण्यात आले. यावेळी मुंबई स्थित ओझरम ग्रामस्थ आणि ओझरम गावावरून आलेले असंख्य ग्रामस्थ या स्नेहमेळाव्याला उपस्थित होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे मंडळाने आतापर्यंत केलेल्या वाटचालीची विस्तृत माहिती सांगितली.
*गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव:-*
यावेळी सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात विविध परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे तसेच मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच, पटसंख्येअभावी ओझरमची शाळा कदाचित बंद होण्याची शक्यता होती. मात्र, सदर शाळा सुरू राहण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे, असे मंडळाचे चिटणीस प्रथमेश राणे, स्वप्नील राणे, दिनेश राणे, सदैव कार्यतत्पर असलेले मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे, उपाध्यक्ष अशोक राणे, ज्येष्ठ लोककला अभ्यासक सदानंद राणे यांचाही यावेळी मंडळातर्फे विशेष गौरव करण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना विद्याधर राणे म्हणाले की, आताची शिक्षणपद्धती, त्यात झालेला बदल, घ्यावी लागणारी मेहनत हे सविस्तर मुलांच्या मनावर ठसवलेच. ‘एक दोन तीन चार, ओझरम गावची मुले हुशार’ ही उत्स्फूर्तरीत्या घोषणा देऊन सर्वच मुलांचा उत्साह द्विगुणित केला. तसेच, “कितीही उच्च पदावर गेलात तरी आपल्या गावच्या मातीला कधीच विसरू नका” हा महत्वाचा संदेश सार्‍यांनीच आपल्या मार्गदर्शनात दिला.यानंतर मंडळाचे सहसचिव विजय सावंत यांनी, हे मंडळ का स्थापन करण्यात आले, नेमकी त्याची असलेली गरज, त्याची आतापर्यंतची प्रगती, आपण सर्व एकत्र आलो तर कुठलंही काम आपल्याला अशक्य नाहीच तसेच या मंडळाची जबाबदारी आपणा सर्वांवरती आहेच.तुम्ही सर्वांनीच आपापल्या परीने यासाठी सहकार्य करायचं आहे हे अगदी मुद्देसूदपणे ठसवून सांगितलंच. यावेळी अध्यक्षीय भाषणात महादेव राणे यांनी समग्र आढावा घेतलाच. तसेच ‘मोबाईल या ब्रह्मराक्षसापासून मुलांनी थोडे दूरच रहावे, तरच जीवनात प्रगती शक्य आहे’ हा अतिमौलिक सल्ला सर्वच मुलांना दिला. यावेळी मंडळाचे आधारस्तंभ संंजय राणे, दिगंबर राणे, उदय राणे, किशोर राणे, सौ. अपर्णा राणे, जयवंत राणे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाची सुरुवात सौ. दीपांजली राणे यांनी गाईलेल्या ‘ओम् नमोजी आद्य, वेद प्रतिपाद्या’ या ईशस्तवनाने अत्यंत सुंदर झाली. दरम्यान समारंभाच्या सूत्रसंचालिका सौ. अमिता राणे-बागवे यांनी ओझरम गावची समग्र माहिती सर्वांना विषद करून सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ. अमिता राणे बागवे यांनी तर आभार दिलीप राणे यांनी मानले. हे स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी मंडळाची सर्व कार्यकारिणी तसेच संजय राणे, नीतीन राणे, मेघश्याम राणे, सौ. अरुंधती राणे-अय्यर यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!