*कोंकण Express*
*बुरंबावडे येथील डांबरीकरणाचे काम निकृष्ट : पंधरवड्याभरात रस्त्याची दुर्दशा*
*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*
देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे नुकतेच विजयदुर्ग रस्त्यालगत बुरंबावडे गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. सदर काम हे निकृष्ट असल्याचे निदर्शनात येत आहे. कासार्डे तिठ्यापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर बुरंबावडे येथे विजयदुर्ग रस्त्यालगत विजयदुर्ग रस्त्यापासून बुरंबावडे गावात जाणाऱ्या रस्त्याचे नुकतेच पंधरा दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले आहे. सदर डांबरीकरण करीत असताना मुळाशी डांबर न टाकताच रस्त्यावर मोठी खडी पसरून सदर खडीवर मध्यम खडीचे थर टाकून त्यावर डांबरीकरण केले जात होते. हे पाहून तेथे असणाऱ्या कामगारांना त्याबाबत सूचना देऊन संबंधित ठेकेदारांना माहिती देण्यास सांगून त्यांना संपर्क साधण्यासाठी पत्रकारांकडून सांगण्यात आलेले होते परंतु कोणीही संपर्क केलेला नाही. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी सदर काम करण्यात आल्यानंतर अगदी आठ दिवसानंतर काही ठिकाणी खडी उपटून वर येऊन रस्त्याची दूरदर्शन होऊ लागलेली आहे. काही ठिकाणी काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. याबाबत काही खुलासा होत नाहीय. सदर कामाबाबत संबंधित मक्तेदार आणि ग्रामपंचायत यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम तातडीने यथार्थ करण्याची आवश्यकता आहे. मुळापासून काम कसे झालेले आहे याबाबत अधिकाऱ्यांनी चौकशी करून पुन्हा मुळापासून कामात टिकाऊ कार्यक्षमता आणण्याची आवश्यकता आहे. जनतेत रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

