*कोंकण Express*
*अभय राणे मित्रमंडळ आयोजित कब्बडी स्पर्धा २०२४ महिला कब्बडी स्पर्धेच्या प्रमुख विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी उपस्थिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
अभय राणे मित्रमंडळ च्या वतीने गेली चार वर्षे ARM चषक ,कब्बडी चां महासंग्राम भरवत खेळाडूंना संधी दिली जाते .खास करून या स्पर्धेस महिला संघाना सुवर्ण संधी दिली जाते .स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी,२०जानेवारी रोजी महिला कब्बडी चे उद्घाटन समयी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली .यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती माझी अध्यक्षा संजना सावंत ,माझी नगरसेविका सुप्रिया नलावडे .सदडेकर,प्राची कर्पे,मेघा सावंत,आकांक्षा राणे,तसेच खास उपस्थिती वेतोबा फेम गावमामी म्हणजेच अभिनेत्री अक्षता कांबळी उपस्थित होत्या ,आपल्या मालवणी बोलितून आयोजक आणि स्पर्धक यांना शुभेच्छा देत महिलांना उत्तम संधी दिल्याबद्दल मंडळाचे सौ कांबळी यांनी आभार मानले.

