*श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळालेने सत्कार*

*श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळालेने सत्कार*

*कोकण Express*

*श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळालेने सत्कार*

ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या,तक्रारी,प्रबोधन करणेत सक्रिय राहून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास (साधकास) गौरविणेत येते, वरीलप्रमाणे कार्याची विशेष दखल घेऊन राज्य कार्यकारिणीने जिल्हा संघटक श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांची उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कारासाठी निवड केली आहे
मौजे वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथील आंबेडकर भवन येथील जिल्हास्तरीय ग्राहक दिन कार्यक्रमात उप जिल्हाधिकारी आरती देसाई यांचे शुभहस्ते जिल्हा ग्राहक पंचायतीचे माध्यमातून श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा स्मृती चिन्ह,मानपत्र,शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार करून गौरव करणेत आला,यावेळी तहसीलदार दीप्ती देसाई,नायब तहसीलदार भावना शिंदे,ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश पाटील,तालुकाध्यक्ष तेजस साळुंके,सर्वश्री नासिर काझी,भालचंद्र साठे,जयेंद्र रावराणे,संजय सावंत,महेश संसारे,कणकवली तालुकाध्यक्ष सौ श्रद्धा कदम,गीतांजली कामत, पूजा सावंत,पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,जेष्ठ नागरिक अन इतर मान्यवर बहुसंख्येने आवर्जून उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!