*कोकण Express*
*क्षत्रिय मराठा समाज कोकण विभाग सिंधुदुर्ग जाहीर बैठक*
*मराठा आरक्षणाची सद्य परिस्थिती आणि क्षत्रिय मराठा समाजाला आरक्षण फक्त मराठा म्हणूनच या विषयावर चर्चा सत्र*
*सरसकट कुणबी आरक्षणावरून कोकणात मराठा समाजाची झालेली द्विधा मनस्थिती आणि कोकणमध्ये मराठा कुणबी सलोखा स्थापन करून *मराठा समाजाला हिंदु मराठा* *म्हणुनच आरक्षण मिळणे तसेच कोकण पट्ट्यातील संपूर्ण मराठा समाज संघटनसाठी मराठा समाजाची जाहीर बैठक दिनांक ०७.०१.२०२४ रोजी सकाळी १० वाजता भगवती हॉल, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संपूर्ण कोकण पट्ट्यातील मराठा समाजाची एकजूट करून आपल्या मागण्यांचे सरकारकडे निवेदन देणे करीता संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मराठा समाजाचे प्रतिनिधी, क्षत्रिय मराठा समाजबांधव, आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक यांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. सर्व मराठा समाज बांधव यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.*
*निमंत्रक – 🙏कोकण विभाग संलग्नित क्षत्रिय मराठा समाज सिंधुदुर्ग*🙏
*रविवार दि.०७.०१.२०२४*
*वेळ – सकाळी १० ते १**
*स्थळ :- भगवती हॉल, कणकवली.*