राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती

*कोंकण Express*

*राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया फ्रंटच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

राष्ट्वादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया सेल जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष पदाच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. आदरणीय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा तळागाळापर्यत पोचविण्यासाठी पक्ष संघटना मजबुतिने उभी करावी यासाठी या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. सिंधुदुर्ग जाल्ह्याच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष पदी संजय भाईप यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.संजय भाईप गेली तीन वर्षे सावंतवाडी तालुका अध्यक्ष होते. त्याच्या कामाची दखल घेत कोकण विभागीय अध्यक्ष सचीन पाटकर यांनी त्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची शिफारस केली होती.त्याच्या नियुक्तीसाठी अर्चनाताई घारे-परब, अमीत सामत, पुडंलीक दळवी यांनीही मान्यता दर्शवली होती.त्यांच्या कामाजी दखल घेत प्रदेश अध्यक्ष सोशल मीडिया फ्रंट राष्ट्रवादी काँग्रेस महादेव बालगुडे, प्रदेश सह अध्यक्ष मोहसिन शेख यांनी संजय भाईप यांच्या पदाची नियुक्ती जाहीर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!