आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्मान

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्मान

*कोंकण Express*

*आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सन्मान*

दिनांक ३०/१२/२०२३ रोजी देवगड तालुक्यातील सन्मान सोहळे आटोपून, रात्री वैभववाडी तालुक्यात दाखल होत, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात १ ते २ तास पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून, नानाविध समस्या जाणून घेऊन, त्यांचा योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे अभिवचन देतानाच पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा माऊली मित्र मंडळाचे संस्थापक व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी केला सन्मान,

*जिल्हा कार्यकारी सदस्य दिलीप नारकर, युवक कॉंग्रेस तालुका अध्यक्ष भालचंद्र जाधव यांचा अविनाश गावडे, भाऊ डगरे, बाबुराव घाडिगावकर, वैभववाडी तील एकनिष्ठ कॉंग्रेस कार्यकर्ते यशवंत वासुदेव प्रभूलकर यांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव केला,

*यावेळी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी असे प्रतिपादन केले की, आगामी काळात येऊ घातलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये संपूर्ण मतदारसंघ च नव्हे तर महाराष्ट्र व संपूर्ण देशात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचीच सत्ता स्थापन करण्या करिता गावपातळी पासून देशाच्या कानाकोपऱ्यात कॉंग्रेस पक्षाचाच बोलबाला घुमत राहिला पाहिजे,
संपूर्ण मतदारसंघ पालथा घालत असताना जे काही चित्र आम्ही पाहिले ते न बोलणे च योग्य अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या,

*आणि आम्ही तुमच्या सोबत सदैव राहु असे अभिवचन दिले,

*तसेच माजी आमदार हुस्नबानु खलिफे ( कणकवली च्या सुकन्या काजी ) जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या सहकार्या बद्दल ऋण व्यक्त केले,

*याप्रसंगी तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करुन राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सहित सर्वच मंडळाचे आभार मानले,

*यावेळी वैभववाडी तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते,

*संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सर्व मंडळांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते,

*संपूर्ण मतदारसंघ मागील ४ ते ५ महिने पिंजून काढत असताना, तसेच मागील ४० वर्षे सदैव साथ दिली त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करत असताना पेडणेकर यांना शब्द हि सुचेनात,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!