*कोकण Express*
*वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी “उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून “एक पणती वंचितांच्या दारी “या सामाजिक उपक्रमाचे आयोजन*
*कासार्डे प्रतिनिधी:संजय भोसले*
सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाउंडेशन ने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी उमेद फाउंडेशन च्या वतीने या वंचित घटकांना पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ, देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात आपला मोलाचा हातभार लावावा..
*या उपक्रमात सहभागी होताना….* *आपल्याला स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ / पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशन कडे दिनांक 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोच करावे.*
*फराळासाठी आर्थिक मदत आपण ऑनलाइन स्वरूपात/ रोख स्वरूपात केव्हाही उमेद फाउंडेशनकडे खालील अकाउंट वर जमा करू शकता..*
*मदत पाठवण्याकरिता बँक अकाउंट माहिती* *A/C name =UMED FOUNDATION*
*A/C Number- 636701000890* *बँक नाव -* *ICICI BANK*
*IFSC Code =ICIC0006367*
*Google pay/Phone pay* – *7972395675*
*मदत देण्यासाठी काही महत्त्वाची नियमावली .*स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ देणार असल्यास देताना त्याचे व्यवस्थित पॅकेट करून द्यावेत.*
*आर्थिक मदत* ..
*एका कुटुंबासाठी फराळ -* *300* रू. ,
*दोन कुटुंबासाठी फराळ – 600 रू*
*या टप्प्यात रक्कम स्वीकारली जाईल*
*आपण दिलेल्या 300 रु. मदतीतून खालील प्रकारे एका गरजू कुटूंबासाठी दिवाळी किट बनविण्यात येईल*
*अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील , पणत्या, लाडू (250 ग्रॅम), चिवडा (500 ग्रॅम) चकली (250 ग्रॅम), शंकरपाळी ( 250 ग्रॅम ) इ.*आपण दिलेली मदत पुढील ठिकाणी पोहोचवण्यात येईल* *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे* *सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि मनोरुग्ण आश्रम* *आपण सुचवलेली किंवा आपल्या संपर्कातील गरजू कुटुंबे*
*वंचितांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणून दिवाळी त्यांची तेजोमय करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे..असे मत श्री.राजेंद्र एस.पाटील-प्रमुख,* *सामाजिक दिवाळी मोहिम,सिंधुदुर्ग* *8888650077* *यांनी व्यक्त केले आहे.