*कोकण Express*
*फोंडाघाट पंचक्रोशी मध्ये वाघापासून मनुष्य व अन्य पाळीव प्राण्यांना जीवितास धोका*
फोंडाघाट पंचक्रोशी मधील लोरे ,वाघेरे -कुरली वसाहत हवेली नगर या भागामध्ये वाघाचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे मानवी व पाळीव प्राण्यांच्या जीवित धोका निर्माण झाला आहे ,असे निवेदन वनरक्षक, वनविभाग अधिकारी, फोंडाघाट. तालुका -कणकवली ,जिल्हा- सिंधुदुर्ग. यांना दिले असून, यांनी आपल्या स्तरावर यंत्रणेचा वापर करून मानवी व अन्य प्राण्यांना जीवितास कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये, म्हणून अशा प्राण्यांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे, असे आवाहन श्री संजय वसंत आग्रे, जिल्हाप्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

