मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा शिरवंडे हायस्कूल येथे उत्साहात सुरु

मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा शिरवंडे हायस्कूल येथे उत्साहात सुरु

*कोकण Express*

*मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा शिरवंडे हायस्कूल येथे उत्साहात सुरु*

मालवण तालुका स्तरीय मैदानी स्पर्धा त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडेच्या भव्य पटांगणावर दिनांक ११/१०/२३ रोजी उत्साहात सुरु झाल्या .. अगदी ग्रामीण भागातील मालवणपासुन सुमारे ४०किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत या स्पर्धा असूनही तालुक्यातील २९ शाळांमधील ४००स्पर्धकांनी यात सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन क्रिडा प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू गांवकर व सामाजिक कार्यकर्ते श्री. दशरथ गांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष श्री उत्तम गांवकर हे होते. यावेळी क्रिडा व शारीरिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. अजय शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी
श्री. उत्तम गांवकर अध्यक्ष शालेय समिती, श्री. दिपक चव्हाण, सदस्य शालेय समिती, श्री. राजू गांवकर सामाजिक कार्यकर्ते, मुंबई, श्री. दशरथ गांवकर सामाजिक कार्यकर्ते, सौ. चैताली घाडीगांवकर, सरपंच शिरवंडे, श्री. सुरेश गांवकर, उपसरपंच शिरवंडे, श्री. देवेंद्र पुजारे,उपसरपंच असगणी,श्री.संजय घाडीगांवकर, उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ, श्री. अजित घाडीगांवकर, उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती,श्री.शामराव प्रभुदेसाई अध्यक्ष रामगड संस्था,श्री. सुभाष तळवडेकर, उपाध्यक्ष रामगड संस्था, श्री. लवूराज गांवकर, श्री. रघुनाथ गांवकर, श्री. वासुदेव कासले,रामगड हायस्कूल मुख्याध्यापक श्री. अंकुश वळंजू, असरोंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सुशांत पाटील, हिवाळे. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पवार सर, मालवण तालुका क्रीडा समिती प्रमुख श्री. अजय शिंदे, शिक्षकसेना अध्यक्ष,श्री. कमलेश गोसावी सर, श्री. दिनेश सावंत सर, श्री. कृष्णा कासले. श्री. बाबा सावंत, श्री. प्रकाश कासले श्री. संतोष भोगटे,श्री सिद्धेश गांवकरशिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. प्रदीप सावंत, कास्टा्ईब संघटना जिल्हा अध्यक्ष श्री.संजय पेंडुरकर, ,सर्व , मुख्याध्यापक श्री वामन तर्फे, क्रीडा शिक्षक श्री. सुभाष सावंत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य सेविका, तालुक्यातील क्रीडा शिक्षक, मोठ्या संख्येने स्पर्धेक पालक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांसह तालुक्यातील उपस्थित सर्व क्रिडा शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. वामन तर्फे यांनी केले. सुत्रसंचालन श्री. काणेकर सर यांनी केले. तर आभार क्रिडा शिक्षक श्री. सुभाष सावंत सर यांनी मानले. स्पर्धेचे औचित्य साधून आपली आई कै. सौ. सुलोचना गांवकर यांच्या स्मरणार्थ सर्व स्पर्धेचकांच्या अल्पोपहाराची व सर्व शिक्षक, वाहन चालक व ग्रामस्थ यांच्या दोन दिवसांच्या जेवणाची व्यवस्था शिरवंडे गावचे सुपुत्र आणि शिवसेना वस ई शहर प्रमुख श्री. शरद गांवकर यांनी केली. तर क्रिडा प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री राजू गांवकर यांनी प्रशालेतील स्पर्धक विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी टी शर्ट दिले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी
आर्थिक व इतर सहकार्य करणाऱ्यांचे संस्था आणि शाळेच्या वतीने आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!