मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हुंबरटमध्ये प्रात्यक्षिके!

मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हुंबरटमध्ये प्रात्यक्षिके!

*कोकण Express*

*मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची हुंबरटमध्ये प्रात्यक्षिके!*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

ग्रामीण कृषी उद्योजकता जागरूकता विकास योजनेंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यलायच्या विद्यार्थ्यांनी हुंबरट येथे विविध प्रात्यक्षिके केली. विद्यार्थ्यांनी बीज प्रक्रिया, मूल्यवर्धित उत्पादने (पनीर, जॅम) कशाप्रकारे तयार करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले. याशिवाय माती परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती दिली. सेंद्रीय शेती व किटक बियाणांचे वर्गिकरण कसे करावे याची माहिती दिली.

कृषीदूत ऋषिकेश परीट, पुंडलिक गावडे, प्रतिकराज पाटील, आदित्य बुद्राक्ष, अजिंक्य खंदे, सिद्धेश कुंभार, अर्थव पिसे, वामसी कृष्णा, थरून चौधरी हे विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संते, श्री शिर्के, श्री. जंगले, श्रीमती पाटणकर, सुखवे यांचे मार्गदर्शन लाभले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच मनीषा गुरव, उपसरपंच संदीप होळकर, ग्रामसेवक वैभव ठाकूर, ग्रा. पं. सदस्य नितीन बागवे, अंगणवाडी सेविका निकिता बागवे यांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!