*कोकण Express*
*शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वैभववाडी तालुका कार्यकारणी, बूथ प्रमूख व शाखा प्रमुख यांची संयुक्त सभा संपन्न*
*माजी जिल्हाध्यक्ष सतीश सावंत युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाही यांची प्रमुख उपस्थिती*
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वैभववाडी तालुका कार्यकारणी, बूथ प्रमूख व शाखा प्रमुख यांची संयुक्त सभा शिवसेना स्थानिक नेते सतीश सावंत व युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी तालुक्यातील तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघातील बूथप्रमुख, शाखा प्रमुख, पदाधिकारी यांच्या मार्फत संघटनात्मक आढावा घेण्यात आला.
जनतेच्या मनात सरकार विषयी रोष असून भाजप च्या फसवेगिरी ला येथील जनता कंटाळलेली आहे. भाजपचे लोक सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्याना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे डोळेझाक केले आहे. एक रुपयात पीकविमा, कर्जमाफी, आंबा काजू विमा, फळबाग नुकसान भरपाई इत्यादी मध्ये हे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. सरकारकडून कोणतीही मदत दिली गेली नाही. यासाठी प्रत्येक गावागावांत सरकारच्या विरोधात जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे झालेल्या दुर्लक्ष बाबत जनतेला सजग व जागृत करावे. शासनाच्या वैयक्तीक लाभाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मदत करून लाभ मिळवुन द्यावा. यावेळी सतीश सावंत व सुशांत नाईक यांच्या हस्ते वैभववाडी तालुक्यातील नवनिर्वाचित तंटामुक्त समिती अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
14 सप्टेंबर 2023 रोजी तिन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांचा संघटनात्मक आढावा त्या त्या जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय घेण्यात येणार आहे.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके,महिला आघाडी प्रमुख नलिनी पाटील, माजी जि.प.सदस्या दिव्या पाचकूडे, युवा सेना जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुरी, शहर प्रमुख शिवाजी राणे, उपतालुका श्रीराम शिंगरे, विभाग प्रमूख जितेंद्र तळेकर, कोळपे सरपंच सुनिल कांबळे, महिला शहर प्रमुख मानसी सावंत, नगरसेवक मनोज सावंत, बाबा मोरे, सुनिल पवार, जनार्दन वितारे, नयना रावराणे, सूर्यकांत परब, लोरे युवासेना विभाग प्रमुख गणेश पवार, कोकिसरे युवासेना विभाग प्रमुख रोहित पावसकर, राजाराम गडकर, समाधान काडगे, यशवंत गवाणकर, वसंत मोरे, सुनील रावराणे, सिद्धेश रावराणे , शंकर कोकरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

