मुंबई येथे सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर किशोर दिनकर जठार अकाली निधन

मुंबई येथे सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर किशोर दिनकर जठार अकाली निधन

*कोकण Express*

*मुंबई येथे सारस्वत बँकेचे जनरल मॅनेजर किशोर दिनकर जठार अकाली निधन*

*कासार्डे प्रतिनिधी : संजय भोसले*

तळेरे गावचे रहिवासी असलेले आणि नोकरी निमित्त मुंबई येथे सारस्वत बँकेमध्ये जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असलेले किशोर दिनकर जठार (वय ६०) यांचे नुकतेच अल्पश: आजाराने मुंबई लीलावती हाॅस्पीटलमध्ये उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.
किशोर जठार हे सारस्वत बॅंकेत जनरल मॅनेजर या महत्त्वाच्या पदावरती कार्यरत होते.नोकरी करत असतांना देखील एक प्रतिभावंत कवी, लेखक, गायक, अभिनेता असे अनेक गुणसंम्पन्न असे व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते.त्यांना साहित्य क्षेत्राची विशेष आवड होती.त्यांचा काव्य संग्रह देखील प्रकाशित झाला आहे.सरस्वत बँकेच्या सांस्कृतिक विभागाचे ते प्रमुख होते.बँकेच्या प्रसिद्ध होणाऱ्या मासिकेचेही ते संपादक होते.टाटा रुग्णालयात रात्रपाळी नोकरी करून त्यांनी केमिकल इंजिनीयर ही पदवी संपादित केली होती.तळेरे येथील सामाजिक कार्यकर्ते राजू जठार यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली,भाऊ,वहिनी असा परिवार आहे.त्यांच्या अकाली निधनाने सर्वत्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!