*कोकण Express*
*भाजपाच्या राजापूर लांजा साखरपा विधानसभेच्या वॉररूम चे उद्घाटन*
*भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांच्या हस्ते झाले उद्घाटन*
*लांजा : प्रतिनिधी*
भाजपाच्या राजापूर लांजा साखरपा विधानसभेच्या वॉररूम चे उद्घाटन भाजपाच्या नेत्या उल्का विश्वासराव यांच्या हस्ते
करण्यात आले. आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये वॉररूम सुरू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील शंभरहून अधिक विधानसभा क्षेत्रामध्ये हे वॉररूम कार्यान्वित झाले आहेत. याच अनुषंगाने झर्ये येथे
भाजपाच्या या वॉर रूमचे उद्घाटन भाजप नेत्या उल्क विश्वासराव यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनाप्रसंगी नरेंद्र मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात उल्का विश्वासराव यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात होणाच्या विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढून आपल्याला एकहाती विजय संपादन करावयाचा आहे या दृष्टीने सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यानी एकदिलाने आणि एकजुटीने काम करून विजय संपादन करूया आणि या मतदारसंघावर भाजपाचा झेंडा फडकवूया असे आवाहन यावेळी उल्का विश्वासराव यांनी केले.. याप्रसंगी भाजपाचे पदाधिकारी चंद्रकांत लिंगायत, संजय आयरे यांच्यासह विधानसभा क्षेत्रातील अनेक शक्ती केंद्रप्रमुख, बुथ अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

