*कोकण Express*
*कणकवली उपजिल्हा रुग्णालयाची परिस्थिती जैसे थेच.?*
*भेटी देणाऱ्या त्या लोप्रतिनिधिंची “तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो” अशी परिस्थिती*
*तापाच्या रूग्णांची फक्त डेंग्यू तपासणी ; मग पावसाळ्याच्या दिवसात इतर तापाचे प्रकार असलेले ताप येत नाहीत का ?*
सरकारी रुग्णालयात रिपोर्ट पॉझिटिव्ह ; तर खाजगी रुग्णालयात रिपोर्ट निगेटिव्ह
*हे नक्की प्रकार काय ? रुग्णांनी करायचे तरी काय ?*
*कणकवली ः प्रतिनिधी*
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरतात. त्यामुळे गोरगरीब जनता तपासणीसाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेते. मात्र सकाळी ८ वाजता सुरू झालेला केस पेपर विभाग हा १२ ते २ वाजेपर्यंत फक्त नोंदी घेतच असतो. दोन केसपेपर मिळेपर्यंत मागे दहा नंबर वाढत जातात. आज शुक्रवारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात केस पेपर विभागाजवळच एक रुग्ण ताटकळत केस पेपरसाठी उभा होता. मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो रुग्ण चक्कर येऊन रांगेतच कोसळला. केसपेपर विभागात अजून दोन कर्मचारी भरले तर रुग्णांना जलद केसपेपर मिळून जलद गतीने उपचार देखील मिळू शकतात. मात्र हे करणार कोण ? मुळात कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला वाली कोण आहे ? अशी चर्चा यावेळी त्या कोसळलेल्या रुग्णाला पाहण्यासाठी जमलेल्या जमावात सुरू होती.
बडे नेते किंवा राजकीय पुढारी हे रुग्णालयात भेट देऊन फोटोसेशन आणि प्रसिद्दी मिळवतात. मात्र आरोग्य विभागाची यंत्रणा गतिमान होईल असे काही आश्वासन देतात ती एक दिवसीय आचरणात येतात. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर ओपीडीमध्ये वेळेत येत. डॉक्टरना शोधायला रुग्ण इकडे तिकडे फिरत असतात. जर उपजिल्हा रुग्णालयाची आरोग्य सेवा गतिमान होणार तर होणार केव्हा ? की रुग्णांनी ताटकळतच उभं राहून आपला जीव गमवावा.
उपजिल्हा रुग्णालयाच्या केस पेपर विभागात केस पेपर लिखाण करण्यासाठी एकच कर्मचारी आहे. या एक कर्मचाऱ्यावर मागील दिवसात उपचार घेतलेल्या रुग्णांची फेरनोंद तसेच नवीन रुग्णांची नोंद अशी दोन कामे पडत असल्यामुळे याचा जबर फटका सर्वसामान्य रुग्णांना बसत आहे. जवळपास दिवसाला शंभरहून अधिक ची ओपीडी या रुग्णालयास होत असताना देखील हे रुग्णालय काहीसे आश्वासन पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.

