सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरांच्या लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा सज्ज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरांच्या लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा सज्ज

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरांच्या लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणा सज्ज*

* गुरांना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख ५ हजार लशी प्राप्त*

*शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना लसीकरण करून घ्यावे, प्रशासनाचे आवाहन “लम्पी ची लस ७० टक्के गुरांना दिल्याची माहिती*

 *लम्पी रोगामुळे जनावरांचा मुर्त्या झाल्यास मिळणार नुकसान भरपाई*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर लसीकरण करत

आहे. एक लाख पाच हजार इतके पशुधन सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. प्रसंगी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचावे आणि आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग यांनी केले आहे. लम्पी हा विषाणुजन्य रोग असल्याने सन 2023-24 मध्ये साधारणतः जुलै 23 पासुन

जिल्हयामध्ये लम्पी आजार काही जनावरांमध्ये आढळु लागला. यामध्ये प्रामुख्याने मागील एक वर्षामध्ये जन्माला आलेली व लसीकरण न झालेल्या जनावरांचा समावेश होता. चालु वर्षामध्ये 01 एप्रिल 2023 पासून आज पर्यंत 669 जनावरांना या रोगाची लागण झालेली.. त्यापैकी 372 जनावरे उपचाराने बरी व 28 जनावरांचा मृत्यु झाला आहे. 269 जनावरे सध्या बाधित असुन उपचार सुरु आहेत. चालू वर्षी सुध्दा शासनाने मृत जनावरांसाठी नुकसान भरपाईची तरतुद केली आहे. मृत जनावरांच्या मालकांना नुकसान भरपाई देण्यात येईल. चालू वर्षी पुन्हा जिल्हयामधिल गोवर्गिय सर्व 105000 जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यासठी लस प्राप्त झाली असुन लसीकरणाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. व उर्वरित लसीकरणाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. तरी सर्व पशुपालकांना आवाहन करणेत येत आहे की त्यांनी त्यांच्याकडील सर्व गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागास सहकार्य करावे तसेच आजारी जनावरांवर उपचार करून घेण्यासाठी नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे सन 2022-23 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये लम्पी रोग प्रादुर्भाव झाला. जिल्हयातील 2250 जनावरांना 2022-23 मध्ये लम्पीची लागण झाली. यापैकी 2127 जनावरे बरी झाली असून 123 जनावरांचा मृत्यु झाला. शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मृतः जनावरांच्या मालकांना २०.०५ लक्ष नुकसान भरपाई देणेत आली आहे. जिल्हयातील गोवर्गिय सर्व 105000 जनावरांचे लम्पी प्रतिबंधक लसीकरण करणेत आले. त्यानंतर लम्पी रोगप्रसार थांबला असल्याचे पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!