आपला दवाखाना यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

आपला दवाखाना यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न

*कोकण Express*

*आपला दवाखाना यांचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न*

कणकवली राष्ट्रीय आरोग्य अभियान 15 व्या वित्त आयोग अंतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ जि प शाळा क्र 4 येथे सुरू करण्यात आला असून त्याचे लोकार्पण आमदार मा. नितेशजी राणे यांनी केले.
मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांची ही संकल्पना राज्यात यशस्वी झाली आहे. जनतेला या दवाखान्याचा पुरेपूर फायदा होईल असे काम करा. पावसाळा सुरू असल्याने साथीचे आजार फैलावत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून काम करावे असे आवाहन आ. नितेश राणे यांनी केले.
यावेळी आरोग्य अधिकारी, भाजपा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!