*कोकण Express*
*हिंदू समाजाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे व काँग्रेस नेतेच;भाजप नेते आमदार नितेश राणे*
*भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव होता*
*उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना या कारवायांना खत पाणी घालण्याचे काम केले*
*म्हणूनच हिंदू जागा झाला, त्याचे प्रतिबिंब हिंदू आक्रोश मोर्चातून दिसते*
*भाजप नेते आमदार नितेश राणे यांची टीका*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संपूर्ण भारत देश २०४७ पर्यंत इस्लाम राष्ट्र करण्याचा डाव पीएफआय,सिमी,इंडीयन मुजाहिद्दीन,रझा अकादमी यांच्या सारख्या संघटनांचा होता.त्याची सुरवात महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाली. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी याला खत पाणी घालण्याचे काम केले.या संघटनांना पाठबळ दिले. आणि महाराष्ट्राचे इस्लामीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम हिंदू समाजाला भोगावे लागले आणि म्हणूनच हिंदू जागा झाला आहे त्याचे प्रतिबिंब हिंदू आक्रोश मोर्चातून दिसत आहे. हिंदू समाजाचे खरे व्हिलन उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते आहेत. अशी घनाघाती टीका भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना उभाटा सेनेचे संजय राऊत यांच्यावर आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका केली.
देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या खासदारांसमोर काँग्रेसच्या घाणेरड्या राजकारणाचे वस्त्रहरण केले आहे.
काँग्रेसने मोठ्या नेत्यांचे खच्चीकरण केले. शरद पवार यांच्या सारख्या नेत्यात प्रंतप्रधान होण्याची क्षमता होती त्यांना ते पद दिले नाही.माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे खच्ची करन कसे केले हे सत्य मोदी साहेबांनी सांगितले. तेव्हा आज काँग्रेस ची चाटू गिरी करण्याचा ठेका घेतलेल्या संजय राउत याना मिर्ची लागली आणि ते बरळू लागले आहेत. पवार साहेबांनी आपली राष्ट्रवादी फुटली नाही असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे.अजिदादांनी सुद्धा तसे सांगितले आहे. मग शकुनी मामा संजय राऊत कुठच्या तोंडाने बोलतो की राष्ट्रवादी फोडली म्हणून. काड्या घालून आग लावाचे काम बंद कर असा इशारा दिला.तू इतका निष्ठावंत मग 2019 ला मुख्यमंत्री पदासाठी पवार साहेबांजवळ उद्धव ठाकरे यांचे नाव न देता कोणाच नाव दिले होते ?. स्वतःच की उद्धव ठाकरेंच ? मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचे नाव दिले उद्धव ठाकरेंनी लाथ घातल्यानंतर नाव बदलले. हा तुझा स्वार्थीपणा सगळ्या जगाला माहित आहे अशा शब्दात संजय राऊत यांचा समाचार आमदार नितेश राणे यांनी घेतला.
बॉक्स
उद्धव ठाकरे पाटणकर व स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी किती वेळा शरण गेले ते सांगू काय ?
संजय राऊत यांना स्वतःचे मालक उद्धव ठाकरेंना किती गाडायच आहे ते त्याने एकदा ठरवावं.कोण किती शरण गेले आणि कोणासाठी शरण गेले हे आम्ही जाहीर करू.
उद्धव ठाकरे पाटणकर व स्वतःच्या मुलाला वाचविण्यासाठी शरण गेले होते.त्यासाठी पंतप्रधान कार्यालयात किती वेळा गेले ते सांगू काय ? कोणासोबत गेले होते ते सांगू काय ? आम्हाला ते सांगण्याची वेळ आणू नका. आमदार बच्चू कडू सीनियर नेते आहे. कोणत्या मागणीसाठी आंदोलन केले पाहिजे हे त्यांना माहिती आहे. आणि लोकशाही मध्ये तो सर्वांना अधिकार आहेत. उद्धव ठाकरेंनी न्याय दिला नाही ते आमच्या सरकार मध्ये मिळेल. हे कडूना माहीत आहे.असे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

