*कोकण Express*
*रानभाज्या, औषधी वनस्पतीचे जीवनातील महत्त्व ओळखा – सौ. मानसी कदम*
*जि.प.प्राथ शाळा आंब्रड बाजार नं – १ येथे रानभाज्या व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन,*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
बाजारात भाज्यांचे दर गगनाला भिडलेले असताना निसर्गसंपन्न सिंधुदुर्गात पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचा उपयोग रोजच्या जीवनात केला पाहिजे, पूर्णतः शुद्ध असणाऱ्या भाज्या या राजात उपलब्ध होतात. औषधी वनस्पतीही मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यांचे उपयोग जाणून घेऊन अशा वमपतीचे जतन, संवर्धन आवश्यक आहे. पुढच्या पिढीलादेखील या नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व समजावून सांगितले — पाहीजे असे प्रतिपादन आंब्रड सरपंच सौ. मानसी महेंद्र कदम यांनी केले.
जि. प. प्राथ. शाळा आंब्रड बाजार न १ येथे रानभाज्या आणि औषधी वनस्पतींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या, यावेळी पोलिस पारील देवेंद्र दळवी शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. जान्हवी मसूरकर उसामाजिक कार्यकर्ते अतुल दलवी, मिळाजी चव्हाण, अंगणवाडी सेविका शैलजा साळसकर, माता-पालक संघाच्या सदस्या, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, या प्रदर्शनात टाकला, भारंगी, शेवगा, कुरडू, अल्लू-पेवगा, कुडा इ रानभाज्या तर तुलस, अडुळसा, हळद, कोरफड, पपई, सूरमीन, गवती चहा, कडू किरायत मेळा इ. औषधी वनस्पती मांडण्यात आल्या होत्या, सहभागी पालकांनी विद्यार्थी व उपस्थितांना प्रत्येक रानभाजी करण्याची पध्दत, औषधाचा उपयोग कसा करावा याविषयी माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. शिल्पा मुळीक यांनी तर सूत्रसंचालन व आभार उपशिक्षक श्री. विवेकानंद गंगावणे यांनी मानले.

