राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर वैभववाडीत जल्लोष

राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर वैभववाडीत जल्लोष

*कोकण Express*

*राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर वैभववाडीत जल्लोष…*

*वैभववाडी/प्रतिनिधी*

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यामुळे वैभववाडी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फटाके

वाजवून आणि पेढे वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला, यावेळी तालुकाध्यक्ष दादामीया पाटणकर, आनंद पवार, वसंत नाटेकर, श्रेया मुद्रस, दिलीप नारकर, गुलजार काजी, वासिम काजी, यासीन बोबडे, मुस्ताक रमदुल, अहमद बोबडे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना 23 मार्च रोजी सूरत कोर्टाचा निकाल आला, त्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत लोकसभा सचिबालयान नियमाप्रमाणे त्यांची खासदारकी रद्द केली होती. चार महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाने शिक्षेला स्थगिती दिल्यानं आता राहुल गांधीना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!